Belagavi

मनुष्याबरोबरच वन्य जीवांनाही जगण्याचा अधिकार : हर्ष भानू

Share

मनुष्याबरोबरच वन्य जीवांनाही जगण्याचा अधिकार घटनेने दिला आहे असे बेळगावचे उप वन संरक्षणाधिकारी हर्ष भानू जी. पी. यांनी सांगितले

बेळगावातील शिवबसव नगरातील एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक संस्थेत पोस्ट खात्याकडून पोस्ट तिकिटांचे व्हर्च्युअल प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी आज टपाल तिकीट संग्रहाबाबत कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पोस्टकार्ड चित्रांचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना उप वन संरक्षणाधिकारी हर्ष भानू जी. पी. म्हणाले, हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या श्रमाला दाद द्यायला हवी. वन संरक्षणाबाबत पोस्टकार्ड प्रकाशित केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. घटनेने माणसासह वन्यजीवांनाही जगण्याचा अधिकार दिला आहे हा संदेश या कार्यक्रमातून दिला आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी टपाल तिकीट संग्राहक, पोस्ट खात्याचे अधिकारी, विध्यार्थी आदी उपस्थित होते.

 

Tags: