Belagavi

बेळगावात बिल्डरचा निर्घृण खून

Share

डोळ्यात तिखट पावडर टाकून चाकूने भोसकून बिल्डरचा खून केल्याची घटना बेळगावात भवानी नगरात मंगळवारी सकाळी-सकाळीच घडली आहे.

बेळगावातील भवानी नगरातील रहिवासी राजू दोड्डबोमण्णावर या ४५ वर्षीय बिल्डरचा डोळ्यात तिखट टाकून चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज सकाळी ६ च्या सुमारास घडली. राजू हा मूळचा बेळगाव तालुक्यातील हलगा-बस्तवाडचा रहिवाशी आहे. सध्या तो भवानीनगर येथील  संस्कृती फार्म येथे रहात होता.

त्याच्या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच डीसीपी रवींद्र गडादी यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी व्यापक जाळे विणले आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रकरणाची नोंद झाली आहे.

Tags: