Belagavi

बेपत्ता झालेल्या सफाई कर्मचाऱ्याचा शोध घ्यावा सफाई कर्मचाऱ्याच्या आईची पोलिसांना विनवणी पोलीस आयुक्तांना केले निवेदन सादर

Share

आदी जाम्बव संघाच्या सदस्यांचा मुलगा सुरेश बेंगळुरी हा गेल्या ८ महिन्यांपासून बेपत्ता असून याचा शोध घेण्याची विनंती पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

आदीजाम्बव संघाच्या सदस्या वेंकटम्मा यांचा मुलगा सुरेश बेंगळुरी हा गेल्या ८ महिन्यांपासून बेपत्ता आहे. सुरेश बेंगळुरी हा चालकासोबत बेपत्ता झाला असून त्याचा शोध लवकरात लवकर घेण्यात यावा, यासाठी वेंकटम्मा यांनी पोलीस आयुक्तांकडे साकडे घातले आहे.

आदी जांबव संघ आणि सफाई काल समिती यांच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले आहे. आपल्या मुलावरच संपूर्ण कुटुंब विसंबून असून त्याचा शोध तातडीने घेण्यात यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी सफाई कर्मचारी काल समितीचे प्रधान सचिव विजय निरगट्टी बोलताना म्हणाले, आदीजाम्बव सफाई कर्मचारी संघाचे कर्मचारी नासिर नामक गाडी चालकासोबत काम करत होते. लॉकडाऊन कालावधीत नासिर पठाण याच्यासोबत गेलेल्या सुरेशचा अद्याप पत्ता लागला नाही. यासंदर्भात नासिर कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. याप्रकरणी पोलिसांनी लक्ष घालून प्रकरणाचा तपास घ्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली.

गेल्या ८ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या सफाई कर्मचाऱ्याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी आज आदी जाम्बव समाजातर्फे त्याच्या आईने केली आहे. या प्रकरणाचा तपास तातडीने पोलिसांनी घ्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.

Tags: