Nippani

निपाणी येथे श्रेयल अमित शहा यांचे भरतनाट्यम सादरीकरण उत्कृष्ट भरतनाट्यम सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली भरतनाट्यम कलेला ऐतिहासिक परंपरा : हेमा वाघमोडे

Share

निपाणी देवचंद कॉलेज येथे हुबळी मयूर नृत्य अकादमी आणि शहा परिवारच्यावतीने भरतनाट्यम नृत्य अलंकार श्रेयल अमित शहा यांचा रंगप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हुबळी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नृत्य अलंकार श्रेयल अमित शहा यांनी भरतनाट्यम सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विदुषी हेमा वाघमोडे यांनी भरतनाट्यम नृत्याला असलेल्या परंपरेबद्दल माहिती देत भरतनाट्यम कलेमुळे मानवी जीवनात होणाऱ्या सकारात्मक बदलाविषयी वर्णन केले.

या कार्यक्रमात आपली कला सादर केलेल्या अमित शहा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, आपल्याला हि कला नटराजाच्या कृपाशीर्वादाने लाभली आहे. माझ्या या यशामध्ये माझे गुरु, मोठ्यांच्या आशीर्वादाचा वाटा असून हि कला शिकण्यासाठी माझ्या कुटुंबीयांचा पाठिंबा आपल्याला लाभला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला मीनाक्षी राबसाहेब पाटील, माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, कोल्हापूर शिवाजी युनिव्हर्सिटीचे संगीत आणि नाट्य विभाग प्रमुख डॉ. अंजली निघवेकर, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष किरण शहा, कोल्हापूर येथील विद्यासागर शिक्षण संस्थेचे संस्थापक त्रिशाला बाहू साहेब शाह, प्रकाश शहा, प्रिया शहा, अमित शहा, अंजना शहा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: