वन तसेच अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांचा 62 वा वाढदिवस हुक्केरीत उत्साहात साजरा करण्यात आला.

हुक्केरीतील विश्वराज कल्याण मंडपाच्या आवारात मंत्री उमेश कत्ती यांचा 62 वा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्यासह घटप्रभा गुब्बलगुड्डचे मल्लिकार्जुन स्वामीजी, यरनाळचे ब्रह्मानंद स्वामीजी, खानापूर, यमकनमर्डी, क्यारगुड्ड येथील स्वामीजींसह हरगुरू चरमुर्ती स्वामीजी आदींनी मंत्री कत्ती यांचा सत्कार करून त्यांना आशीर्वाद दिले. त्यानंतर कत्ती यांनी कुटुंबियांसमवेत केक कापून वाढसीव्हीसी साजरा केला. यावेळी त्यांच्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी बेळगाव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आदी क्षेत्रातील नेते, विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कंत्राटदार, हुक्केरी, संकेश्वर नगरपंचायतीचे सदस्य, तसेच शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते, समर्थक यांनी उपस्थित राहून मंत्री कत्ती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


Recent Comments