Vijayapura

अथणीच्या महिला जागृती केंद्रातर्फे विधायक पद्धतीने महिलादिन

Share

विधायक कार्य करून महिलादिन अर्थपूर्णरीत्या साजरा करता येतो हे अथणीतील महिला जागृती केंद्राच्या महिलांनी दाखवून दिले आहे.

होय, रविवारी अथणीतील महिला जागृती केंद्राच्या महिलांनी विधायक पद्धतीने आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा केला. विजापुरातील श्री सिद्धेश्वर विद्यापीठ वृध्दाश्रमाला भेट देऊन त्यांनी अनाथ ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक कपडे, फळे, ब्रेड, टोस्ट व अन्य साहित्याचे वाटप केले.

यावेळी बोलताना महिला जागृती केंद्राच्या अध्यक्षा गीता तोरी म्हणाल्या, आम्ही अथणीत अनेकवेळा महिलादिन साजरा केला आहे. पण यंदा आम्ही तो आमच्या भागात न करता विजापुरातील या वृद्धाश्रमात साजरा करण्याचे ठरविले. वायफळ खर्च करण्याऐवजी चांगल्या कार्यासाठी खर्च करून विधायक पद्धतीने महिलादिन साजरा करत आहोत असे त्या म्हणाल्या.

याप्रसंगी दीप चोळी, रोहिणी यादवाड, श्वेता अन्नेपणावर, जया पुजारी, विशालाक्षी अंबी, भारती कोरे, शुभांगी पाटील, सुधा अन्नेपणावर, अर्चना बुसनूर उपस्थित होत्या.

Tags: