Politics

रायबाग मतदार संघातील पशुवैद्य, चिकित्सालयांबाबत विधानसभेत चर्चा

Share

रायबाग मतदार संघात पशुवैद्य आणि पशु चिकित्सालयांची कमतरता असल्याबाबत कुडचीचे . पी. राजीव यांनी आज या. दुर्योधन ऐहोळे यांच्यावतीने विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.

होय विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी आ. पी. राजीव यांनी आज या. दुर्योधन ऐहोळे यांच्यावतीने विधानसभेत लक्ष्यवेधी प्रश्न उपस्थित केला. फ्लो

पशु संगोपन मंत्री प्रभू चव्हाण यांना विचारलेल्या प्रश्नात आ. पी. राजीव म्हणाले, रायबाग मतदार संघात पशुवैद्यांची कमतरता जाणवत आहे. त्याशिवाय पशु चिकित्सालयांची संख्याही कमी असल्याने शेतकऱ्यांना जनावरांवर उपचार करवून घेण्यात अडचण येत आहे. पशुवैद्यांची नियुक्ती करून तसेच सध्या आलेल्या ४ पशु चिकित्सालयांचा दर्जा वाढवून ही अडचण त्वरित सोडवावी अशी मागणी त्यांनी केली. बाईट

यावर पशु संगोपन मंत्री प्रभू चव्हाण म्हणाले, या संदर्भात अर्थखात्याला फाईल्स पाठविण्यात आल्या आहेत. अर्थ खात्याकडून त्यावर अभ्यास सुरु आहे. पशु संगोपन खात्याने 400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा आदेश बजावला आहे. लवकरच ही समस्या सोडविण्यात येईल असे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिले. बाईट

 

Tags: