Belagavi

28 एडी रेजिमेंटच्या निवृत्त सैनिकांची बेळगावात सभा

Share

बेळगावात 28 एडी रेजिमेंटमध्ये सेवा बजावून निवृत्त झालेल्या सर्व माजी सैनिकांच्या संघटनेची वार्षिक सभा येत्या  29 मार्च रोजी होणार आहे. त्यासंदर्भात आज पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली.  

बेळगावातील मारुतीनगरातील एका खासगी हॉटेलमध्ये 28 एडी रेजिमेंटमध्ये सेवा बजावून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांच्या संघटनेची वार्षिक सभेच्या पूर्वतयारीची बैठक झाली. नियोजित सभेला केवळ कर्नाटकचा नव्हे तर विविध राज्यातील 28 एडी रेजिमेंटचे निवृत्त सैनिक उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वार्षिक सभेच्या संयोजनावर आणि व्यवस्थेवर यावेळी चर्चा करण्यात आली. या संदर्भात ‘आपली मराठी’सोबत बोलताना 28 एडी रेजिमेंट निवृत्त सैनिक संघटनेचे पदाधिकारी निवृत्त हवालदार कुमार हिरेमठ म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगावात 28 एडी रेजिमेंट निवृत्त सैनिक संघटनेची वार्षिक सभा होणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसंदर्भात आज बैठक घेण्यात आली आहे. विविध राज्यातून संघटनेचे पदाधिकारी या वार्षिक सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विविध मुद्यांवर चर्चा करून ही सभा यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  आजच्या पूर्वतयारीच्या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: