होळी रंगपंचमी निमित्त मार्केट पोलीस स्थानकात शनिवारी सायंकाळी सात वाजता पोलीस निरीक्षक तुळशीदास मलिकार्जुन यांच्या नेतृत्वाखाली शांतता कमिटीची बैठक बोलविण्यात आली होती बैठकीचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल यांनी सरकारचे नियम वाचून होळी शांततेत करण्याचे आव्हान केले

सुनील जाधव यांनी बोलताना म्हणाले पारंपरिक प्रमाणे रंगपंचमी यावर्षी उत्साहात साजरी होईल गेल्या दोन वर्षापासून करोनाच्या महासंकटामुळे रंग उत्सव आपल्याला साजरा करण्यात आला नाही तरी या वर्षी सरकारने रंगोत्सव साजरा करण्यासाठी परवानगगी त्याबद्दल सरकारचे अभिनंदन आम्ही नियमांचे पालन करून रंगपंचमी शांततेत साजरी करू असे आश्वासन सुनील जाधव यांनी दिली

यानंतर अभिजीत आपटेकर यांनी उत्सव साजरा करताना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजेत सरकारी नोकर किंवा विद्यार्थ्यावर कोणी रंग घालू नये . पारंपरिक प्रमाणे जत्रा करून होळी सण साजरा करावा असे सांगितले
यावेळी उपस्थित नगरसेवक राजू भातकांडे प्रताप मोहिते संजय नाईक उत्तम नाकाडे साई कणेरी यासह अन्य शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते


Recent Comments