Belagavi

बेळगावात भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू

Share

 भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बेळगावातील टिळकवाडी परिसरात उघडकीस आली आहे.

होय, टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मोरेश्वर असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. कौटुंबिक कलहातून त्याचा मृत्यू झाला असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आज सकाळी तो उठला. नंतर चहा प्याल्यावर साडेनऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्या ओठांजवळचा भाग निळसर रंगाचा दिसून आला. विष प्याल्यानंतर जसा रंग दिसतो, तसा रंग त्याच्या ओठांजवळ दिसून आल्याचे सांगण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून तो कौटुंबिक कलहाने त्रस्त होता असे समजते. टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून चौकशी केली. मात्र मृताच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार करण्यास नकार दिल्याने संशय निर्माण झाला आहे. पोलीस तपासातच मोरेश्वरच्या मृत्यूचे गूढ उकलणार आहे.

 

Tags: