जनतेच्या दारी महसुली दाखले पोहोचविण्याच्या सरकारच्या योजनेला खानापुरात आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी शनिवारी चालना दिली.

होय, महाराष्ट्रासह इतर काही राज्यांप्रमाणे कर्नाटक सरकारनेही ‘जनतेच्या दारात सातबारा उतारा’ ही अभिनव योजना सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत सातबारा उतारे, उत्पन्न आणि जातीचे दाखले आदी महसुली दाखले व कागदपत्रे नागरिकांच्या दारात आणून देण्यात येणार आहेत. खानापूर तालुक्यातील हलकर्णी गावात आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी आज, शनिवारी या योजनेचे उदघाटन केले.
यावेळी तहसीलदार प्रवीण जैन यांच्यासह महसूल खात्याचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments