हुक्केरी शहरात श्री जगद्गुरु रेणुकाचार्य जयंती निमित्त विविध कार्यक्रयांचे आयोजन करण्यात आले आहे. हिरेमठाचे पीठाधीश चंद्रशेखर महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बेंगळूर विभूतीपूर मठाच्या महांतलिंग स्वामिनी वृक्षांना पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. यापूर्वी आडवी सिद्धेश्वर पिठापासून शेकडो महिलांनी रेणुकाचार्यांच्या पालखी मिरवणुकीत सहभाग घेतला.
यावेळी बोलताना चंद्रशेखर महास्वामी म्हणाले, 16 मार्च रोजी रेणुकाचार्य जयंतीचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
यानंतर माजी खासदार रमेश कत्ती यांनी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या मान्यवरांना सन्मानित करून उपस्थितांना उद्देशून बोलताना सांगितले, हजारो वर्षांचा इतिहास असलेले रेणुकाचार्य यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या तत्त्वांना अनुसरून आपणही समाजासाठी आपल्या परीने योगदान देणे गरजेचे असले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी घटप्रभा गुब्बलगुड्ड मठ, क्यारगुड्ड मठ, विरक्तमठ, यर्नाळ, मुत्नाळ मठांचे मान्यवर श्री, ख्यातनाम गायक रवींद्र सुरगावी, विजया हॉस्पिटलचे रवी पाटील, महाराष्ट्र भाजप कमिटी अध्यक्ष शिवाजी पाटील, अखिल भारतीय वीरशैव महासभेचे युवा घटक अध्यक्ष मनोहर अब्बिगेरी, शिवगौड पाटील, रमेश पाटील, नगरपालिका अध्यक्ष ए के पाटील, महावीर निलजगी, अशोक पाटील आणि अनेक भक्त उपस्थित होते.


Recent Comments