मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला प्रसारमाध्यमातूनच माहिती मिळाली आहे. जर मला मंत्रिपद दिल्यास ती जबाबदारी मी समर्थपणे सांभाळेन असे सांगत आ. दुर्योधन ऐहोळे यांनी आपली सुप्त इच्छा बोलून दाखवली.

रायबाग मतदारसंघातील बेळकूड आणि जैनापूर गावात रस्ताकामाला आ. दुर्योधन ऐहोळे यांनी शनिवारी चालना दिली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. ऐहोळे म्हणाले, ५ राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालाने भाजप नेते व कार्यकर्त्यांचा जोश वाढला आहे. कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारात जर मला मंत्रिपद दिले तर ती जबाबदारी मी समर्थपणे सांभाळेन. मला मंत्रिपद दिले नाही तरी नाराज होणार नाही. सध्या मला दिलेल्या आदिजांबव विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत मतदारसंघाचा विकास करेन असे आ. दुर्योधन ऐहोळे यांनी सांगितले.


Recent Comments