Belagavi

हाफ पीच क्रिकेट स्पर्धेला वडगाव येथे उत्साहात प्रारंभ

Share

 श्री मंगाई देवी स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेला वडगाव येथे उत्साहात प्रारंभ झाला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक अभिषेक कलघटगी, निकिता कलघटगी, समाजसेविका माधुरी जाधव, नगरसेविका सारिका पाटील, नगरसेविका दिपाली टोपगी ,रिटा पाटील,  संतोष टोपगी, शशिकांत चव्हाण, विनायक पाटील, महेश धुडूम उपस्थित होते. यानंतर निकिता कलघटगी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. श्री मंगाई देवी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव करत सर्व महिलांचा स्वागत सत्कार केला.

कोरोना योद्धा आणि बेळगावच्या पहिल्या महिला अँब्यूलन्स ड्रायव्हर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका माधुरी जाधव-पाटील यांनी जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आणि सर्व महिलांना संदेश दिला की ज्या महिलांचा वर अन्याय होत आहे त्या महिलांना न्याय मिळवून देण्याकरिता सर्व महिलांनी पुढाकार घ्यावा. त्याच बरोबर महिलांनी पुढे येऊन रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवावा असे आव्हान केले. त्याच बरोबर नगरसेविका सारिका पाटील यांनी भागातील काहीही समस्या असतील आपण सोडवून देऊ आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे सांगितले. यानंतर समाजसेवक अभिषेक कलघटगी यांच्या हस्ते यष्टीपूजन करून क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. गीता पाटील यांच्या हस्ते टॉस उडवण्यात आला. नगरसेविका सारिका पाटील यांच्या हस्ते चेंडू फळी खेळून खेळाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी मंगाई देवीच्या परिसरातील महिला आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

 

Tags: