बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम सध्या गतीने सुरू आहे.

बेळगावकरांचा मानबिंदू असणाऱ्या धर्मवीर संभाजी चौक स्मारक विकासामुळे हा परिसर अधिकच आकर्षक होत आहे. सुशोभीकरणाचे हे काम शहराचे आमदार अनिल बेनके यांच्या फंडातून केले जात आहे. या कामाची आ. अनिल बेनके व धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस प्रसाद मोरे वेळोवेळी दखल घेत पाहणी करत आहेत.
धर्मवीर संभाजी महाराज व बेळगावकरांचा ऐतिहासिक संबंध आहे संभाजी महाराज यांचे बेळगावात वास्तव्य झालेले आहे त्यामुळे त्यांच्या बाबतीत बेळगावकर जनता फार संवेदनशील आहे.
स्मारकासाठी घडीव दगडाचे काम करण्यात येत आहे. कुशल कारागिराकडून हे काम करून घेण्यात येत आहे . त्यामुळे या कामाचा दर्जा उच्च आहे. या कामाची पाहणी करून शंभू भक्त समाधान व्यक्त केले. फ्लो
यावेळी धर्मवीर संभाजीराजे चौक सुशोभीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मूर्तिकार संजय किल्लेकर यांना महाराजांच्या पुतळ्याच्या मागील भिंतीवरील स्वराज्याच्या इतिहासातील कोरीव काम करण्याची जबाबदारी दिली. यावेळी बोलताना मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी, सुशोभीकरणाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. पण मध्यंतरी कोरोना कारणामुळे निधी अनियमित आल्यामुळे काम संथ गतीने सुरु होते. आता सरकारी निधीची व्यवस्था झाल्यामुळे कामास गती आली आहे. त्यामुळे लवकरच सुशोभीकरणाचे काम लवकरच पूर्णत्वास जाईल असे मत व्यक्त केले. बाईट
यानंतर शिवसेना जिल्हाध्यक्ष बंडू केरवाडकर यांनी कंत्राटदार व सुशोभीकरण समिती यांचे योग्य दिशेने कार्य चालू आहे. कोरीव दगडाचे काम चालू असल्याने त्याला पुरेसा वेळ देणं गरजेच आहे असे मत त्यांनी मांडले. बाईट
मूर्तिकार संजय किल्लेकर, मराठा समाजाचे नेते किरण जाधव गुणवंत पाटील, श्रीनाथ पवार, नितीन जाधव प्रसाद मोरे, सुनील जाधव आदी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments