तालुका भागातील येळ्ळूर गावात युवा सबलीकरण आणि क्रीडा खात्याने गायरान जमिनीवर मिनी स्टेडियम उभारण्याची योजना आखली आहे. मात्र, या स्टेडियमला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून सदर स्टेडियम गायरान जमिनी ऐवजी अन्यत्र उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भातील निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर या गावातील सर्वे क्रमांक 142 मध्ये 66 एकर 17 गुंठे इतकी गायरान जमीन आहे. यापैकी 40 एकर प्रदेशात सरकारने स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थ अडचणीत येणार असून, या जागेवर ग्रामपंचायत व्याप्तीतील सुमारे 2700 जनावरे तसेच जवळपास 350 इतर प्राणी यांच्या संगोपनासाठी, पशुधनासाठी या गायरान जागेवर ग्रामस्थ अवलंबून आहेत. त्यामुळे युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाने या जमिनीवरील स्टेडियम बांधण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी विनंती या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात बोलताना येळ्ळूर येथील ग्रामस्थाने सांगितले, सरकारी गायरान जमिनीवर सरकारने स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील शेतकरी पशुधनासाठी या जमिनीवर अवलंबून आहेत. आमचा स्टेडियमला विरोध नाही. परंतु सदर स्टेडियम गायरान जमिनी ऐवजी ठिकाणी उभारण्यात यावे, अशी मागणी आपण करत आहोत. स्टेडियम उभारणीच्या प्रश्नावर गावकऱ्यांचे मत जाणून घेऊन स्टेडियम उभारण्यात यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी येळ्ळूरग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments