Chikkodi

मोदींची जलजीवन मिशन योजना अद्भुत : अधीक्षक अभियंता सी. जी. हुलमनी

Share

 देशातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेली जलजीवन मिशन योजना अद्भुत असल्याचे मत ग्रामीण पेयजल निस्सारण खात्याचे बेळगाव विभागीय अधीक्षक अभियंता सी. जी. हुलमनी यांनी व्यक्त केले.

जलजीवन मिशन योजनेतील विविध तांत्रिक टप्प्यातील कामांसंदर्भात तांत्रिक कर्मचारी आणि कंत्राटदारांसाठी चिक्कोडी येथे दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. बेळगाव जिल्हा पंचायत आणि ग्रामीण पेयजल व निस्सारण खात्याने त्याचे आयोजन केले होते. व्यासपीठावरील मान्यवरांनी दीप प्रज्वलनाने कार्यशाळेचे उदघाटन केले.   

यावेळी बोलताना अधीक्षक अभियंता सी. जी. हुलमनी म्हणाले, घरोघरी गंगा या नावाने देशात व राज्यात जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अमलबजावणीत अभियंते, तांत्रिक कर्मचारी आणि कंत्राटदारांची भूमिका महत्वाची आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेली जलजीवन मिशन योजना अद्भुत आहे.

यावेळी जिल्हा पंचायतीचे योजना संचालक रवी बंगारप्पनावर, चंद्रशेखर मसगुप्पी, एस. के. हुलकुंद, चंद्रशेखर दोडमनी आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: