डिजिटल काँग्रेस सदस्यत्व नोंदणी मोहिमेअंतर्गत, ३१ मार्चपर्यंत ५० लाख सदस्यांच्या नोंदणीचे लक्ष्य गाठणे आवश्यक असून पक्षसंघटना आणि कार्यकर्त्यांच्या नोंदणीसाठी रात्रंदिवस काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री सुदर्शन यांनी व्यक्त केले आहे.

बेळगावमध्ये काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘काँग्रेस डिजिटल नोंदणी अभियान’ अंतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अधिकाधिक सदस्य जोडणीसाठी काम करणे गरजचे आहे. यासाठी डिजिटल सदस्य नोंदणी होत असून आगामी निवडणुकीत पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास सुदर्शन यांनी व्यक्त केला.
घराघरात जाऊन पक्ष विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवून सदस्यांची नोंदणी करावी, पक्षाला अधिक बळ मिळावे यासाठी कार्य करणे आवश्यक असल्याचे सुदर्शन म्हणाले. राजकीय पक्षाचे वर्चस्व हे सदस्यांच्या संख्येवरून निश्चित केले जाते. यासाठी डिजिटल सदस्य नोंदणी अभियान हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी मोतीलाल देवांग, माजी एमएलसी आर व्ही वेंकटेश, प्रभुनाथ दयामांनावर, सुरेश हेगडे, अशोककुमार, एमएलसी चन्नराज हट्टीहोळी, माजी आमदार अशोक पट्टण, राजू शेठ, विनय नावलगट्टी, सतीश मेयरवाडी आदी उपस्थित होते.


Recent Comments