बेळगाव तालुक्यातील कडोली येथील रामनगर गल्लीतील धनगर समाज बांधवांचे आराध्य दैवत श्री विठ्ठल बिरदेव मंदिराचा चौकट उभारणीचा कार्यक्रम विधिवत पुजनासह नुकताच पार पडला.

गुरुबसवलिंग स्वामीजी यांच्या सानिध्यात झालेल्या या कार्यक्रमात शिवाजी गावडे दांपत्यांतर्फे विधिवत पूजन करण्यात आले. प्रमुख आतिथी म्हणून केपिसिसि सदस्य मलगौडा पाटील, माजी ग्राम पं. अध्यक्ष राजु मायाण्णा, माजी. ग्रा.पं. अध्यक्ष दत्ता सुतार, प्रसिद्ध उद्योजक सतिश पाटील यांचे वडिल वसंत पाटील, युवा कार्यकर्ते विनोद झाडमाळे उपस्थित होते.
यावेळी केपिसिसि सदस्य मलगौडा पाटील म्हणाले, मंदिरामुळे देवाप्रति श्रद्धा, भक्तीभाव निर्माण होतो. आदर्श समाज निर्माणासाठी मंदिरांची गरज असुन भव्य मंदिर निर्माण करा, त्यासाठी आ. सतिश जारकिहोळी यांच्या माध्यमातुन आवश्यक सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
नंतर पूज्य गुरुबसवलिंग स्वामिजिंनी आशिर्वचन झाले. तत्पुर्वि अरभावीहुन गावामध्ये आगमन झालेल्या दगडी चौकटीची गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात व सुवासिनींच्या कलशासह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेक ग्रामस्थांनी जीर्णोद्धार कमिटीला देणगी देऊन सहकार्य केले.
या मंदिराचा गाभारा संपुर्ण अरभावि दगडामध्ये आणि कळस सिमेंट काँक्रेटमध्ये होणार असून सुमारे तीस लाख खर्चाची अपेक्षा असुन दानशूर देणगीदार, ग्रामस्थांनी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जीर्णोद्धार कमिटीतर्फे यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी महादेव नरोटी, वजिर शहापुरकर, राजु गावडे, भागाण्णा नरोटी, अर्जुन बेळगावकर, रमेश काणिकर, रायाप्पा नरोटी, गंगाराम कागणिकर, रायाप्पा नरोटी, वजीर देमाण्णवर,गुंडू नरोटी, चन्नाप्पा अप्पूगोळ, बिराप्पा बेळगावकर तसेच धनगर समाजाचे जेष्ठ, युवक, महिलांसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सुत्रसंचलन कल्लाप्पा नरोटी यांनी तर स्वागत गजानन कागणिकर केले. महादेव नरोटी यांनी आभार मानले. अरुण फडके भटजींनी पौरोहित्य केले.


Recent Comments