Belagavi

रोजगार मिळवण्यासाठी कौशल्य शिका मंत्री डॉ. अश्वथनारायण यांचे आवाहन

Share

तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणारे कर्नाटक हे देशातील एकमेव राज्य असून तुम्हाला रोजगार हवा असेल तर कौशल्य शिकण्याची गरज आहे, असे मत उच्चशिक्षण मंत्री डॉ. अश्वथनारायण यांनी व्यक्त केले.

बेळगाव मधील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या 21 व्या दीक्षांत समारंभात सहभागी झालेल्या अश्वथनारायण यांनी हे मत व्यक्त केले आहे. यावेळी ते म्हणाले, समाज आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. कोविड काळात विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला होता. आम्ही देशात स्वावलंबन निर्माण करण्याचे काम करत असून आत्मनिर्भर भारतासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे मंत्री अश्वत्थनारायण यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, आजच्या पदवीधर विद्यार्थ्यांना उत्तम भविष्यासाठी सुवर्णसंधी आहे. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणारे राज्य म्हणून कर्नाटकाचे नाव अग्रभागी आहे. बेळगाव मधील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ हे एक उत्तम विद्यापीठ असून या विद्यापीठामार्फत अनेक अभियंते निर्माण होत असल्याचे ते म्हणाले, यावेळी अभियांत्रिकी तज्ञ डॉक्टर एस. जी. बाळेकुंद्री यांच्या नावे अभ्यास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा डॉ. अश्वथनारायण यांनी केली.

Tags: