Belagavi

महाद्वार रोड येथे नूतन होळी कामन्ना मंदिराचे उद्घाटन जुन्या मंदिराचे नूतनीकरण भाविकांच्या उपस्थितीत मिरवणुकीचे आयोजन

Share

बेळगाव शहरातील महाद्वार रोड येथील विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ नव्या होळी कामण्णा मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले असून या मंदिराचे उद्घाटन आज करण्यात आले.

अनेक भक्तांच्या उपस्थितीत युवक मंडळ आणि पंच कमिटीच्यावतीने भव्य प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली होती. सांप्रदायिक वाद्यवृंद आणि भंडाऱ्याची उधळण करत या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.

सदर मंदिर खूप जुने असल्याकारणाने या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात होळी पौर्णिमा येत असल्याने या औचित्याने युवक मंडळ, पंच कमिटीच्यावतीने या मंदिराचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. मिरवणुकीच्या माध्यमातून देवस्थानाकडे आलेल्या भक्तांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्यात सहभाग घेतला.

या सोहळ्यात भक्तिपूर्ण वातावरणात भाविकांनी सहभाग घेतला.

Tags: