उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यात झालेल्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला असून पंजाब वगळता उर्वरित चार राज्यांमध्ये भाजपने विजय मिळविला आहे. या विजयाचा जल्लोष देशभरात साजरा करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर बेळगावमध्येही विजयोत्सव साजरा करण्यात आला आहे.

बेळगाव शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी भाजपाला मिळालेल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटप आणि विजयाच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 
यावेळी प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया देताना उज्वला बडवाण्णाचे म्हणाल्या, भाजपने जनादेश मिळविला आहे. हा विजय केवळ भाजप कार्यकर्त्यांचा नसून हिंदुत्व, राष्ट्चा विचार आणि भारताची विश्वगुरू होण्याच्या दिशेने चाललेली आगेकूच या साऱ्याचा विजय आहे. पुढील सर्व निवडणुकीत भाजप अशाच पद्धतीने भरघोस मतांनी विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, नेते मुरुगेन्द्र पाटील, दिग्विजय सिदनाळ, भाजप नगरसेवक, कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments