Belagavi

ब्राह्मण विकास मंडळ अध्यक्षांना हटविण्याची मागणी

Share

कर्तव्यात कसूर आणि विकासाच्या बाबतीत बेजबाबदारपणा दाखवल्यावरून ब्राह्मण समाज विकास महामंडळाच्या अध्यक्षांना पदावरून हटवावे अशा अर्थाचा ठराव अखिल कर्नाटक ब्राह्मण महासंघाच्या उत्तर कर्नाटक कार्यकारी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

अखिल कर्नाटक ब्राह्मण महासंघाच्या उत्तर कर्नाटक कार्यकारी समितीची बैठक नुकतीच रायचूर येथे पार पडली. सरकारने ब्राह्मण समाज विकास महामंडळाला कोट्यवधींचे अनुदान मंजूर करूनही त्याचा सदुपयोग करण्यात महामंडळाचे अध्यक्ष सच्चिदानंद मूर्ती अपयशी ठरले आहेत, त्यामुळे ब्राह्मण समाजावर अन्याय झाला आहे असा आरोप सदस्यांनी यावेळी केला. ब्राह्मण समाजाला एकत्र आणून त्याचा लौकिक वाढविण्याऐवजी अध्यक्ष सच्चिदानंद मूर्ती यांनी सरकारची फसवणूक केली असा गंभीर आरोपही सदस्यांनी केला. सदस्यांच्या या आरोपांचा गांभीर्याने विचार करून ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष यांनी हा ठराव मतदानाला घेतला. त्यावर सर्व सदस्यांनी त्याच्या बाजूने मतदान केले. या संदर्भात शिष्टमंडळाकरवी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची मागणी सदस्यांनी केली.

यावेळी अखिल कर्नाटक ब्राह्मण महासंघाचे प्रमोद मुन्नोळी, आर. एस. मुतालिक, राघवेंद्र कुलकर्णी, अरविंद कुलकर्णी, व्यंकटेश दोरखंडीकर आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: