विधानसभेच्या अधिवेशनात ‘ईगलटन’ रिसॉर्ट मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यात जोरदार हमारी तुमरी रंगली. ‘ईगलटन’ रिसॉर्ट मुद्द्यावर कुमारस्वामी यांनी सद्दरामय्या यांच्यावर केलेल्या आरोपानंतर सभागृहात झालेल्या गोंधळाचा भाजप नेत्यांनी मात्र पुरेपूर आनंद लुटला.

विधानसभा अधिवेशनात माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दाखल्यासहीत ईगलटन रिसॉर्ट संदर्भात मुद्दा मांडला. सिध्दरामय्यांनी मात्र कुमारस्वामींच्या अहवालावर सडकून टीका केली. यादरम्यान सिद्धरामय्या आणि कुमारस्वामी या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप करण्यात आले.


Recent Comments