Athani

युक्रेनमध्ये अडकलेले अथणीचे २ विध्यार्थी परतले

Share

 युद्धग्रस्त युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले अथणी तालुक्यातील विध्यार्थी अडकून पडले आहेत. त्यापैकी दोघेजण आज सुखरूप स्वगृही परतले

अथणी तालुक्यातील तेलसंग गावातील दोघे सख्खे भाऊ नागेश व राकेश पुजारी आज, बुधवारी सकाळी स्वगृही परतले. त्यामुळे त्यांच्या घरच्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. कुटुंबीयांनी आरती करून त्यांना घरात घेत प्रेमाने स्वागत केले. तेलसंग ग्रामस्थांनीही या बंधुद्वयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना राकेश पुजारी याने युक्रेनच्या खार्कीव्ह शहरामधील युद्धाचे आपले विदारक अनुभव कथन केले. प्रत्येक क्षण आम्ही जिवाच्या भीतीने जगत होतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळेच आम्ही मायदेशात सुखरूप परतलो असे सांगून त्याने सरकारचे आभार मानले. या युद्धामुळे आमच्या अभ्यासात खंड पडण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आम्हाला भारतातच शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा राकेशने व्यक्त केली.    युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विध्यार्थी पोलंडमार्गे येत असल्याचे त्याने सांगितले.

 

Tags: