हुक्केरी येथे येत्या 12 मार्च रोजी भव्य लोक अदालतीचे आयोजन केले आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन वरिष्ठ न्या. के. एस. रोट्टेर यांनी केले.

हुक्केरी येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना न्या. रोट्टेर म्हणाले, हुक्केरी येथे येत्या 12 मार्च रोजी भव्य लोक अदालतीचे आयोजन केले आहे. दीर्घकाळ रेंगाळत पडलेले खटले तसेच अन्य काही खटले या लोकअदालतीमध्ये निकालात काढण्यात येणार आहेत. प्रलंबित खटल्यांमुळे पक्षकारांनाही मानसिक त्रास, आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे या लोकअदालतीचा पक्षकारांनी लाभ घेऊन खटल्यांचा निकाल प्राप्त करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ न्या. के. अंबण्णा, वकील संघाचे अध्यक्ष आर. पी. चौगला, उपाध्यक्ष एन. आय. देमन्नावर, सचिव एम. के. पाटील, खजिनदार एम. के. तोडल आदी उपस्थित होते.


Recent Comments