राणी चन्नम्मा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या मान्यवरांना मानद डॉक्टरेट तसेच ८६ विद्यार्थ्यांना पदवी, आणि ९ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले.

बुधवारी बेळगावमध्ये सुवर्ण विधानसौध येथे राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या पदमश्री पुरस्कार प्राप्त पंडित राजीव तारानाथ यांना भारतीय संगीत क्षेत्रातील डॉक्टर ऑफ लेटर्स, पदमश्री पुरस्कार प्राप्त डॉ. एच. सुदर्शन बल्लाळ यांना वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर ऑफ सायन्स, वादिराज बी देशपांडे यांना साहित्य क्षेत्रातील डॉक्टर ऑफ लेटर्स या मानद डॉक्टरेट पदवीने राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याचप्रमाणे दहा सुवर्ण पदके, ८६ पीएचडी पदवी प्रदान करण्यात आल्या. बागलकोट बसवेश्वर कला महाविद्यालयातील विद्यार्थिनी सौम्या कुंभार हिला दोन सुवर्णपदके, बेळगाव राणी चन्नम्मा विद्यापीठाची विद्यार्थिनी श्वेता बसवराज गुळन्नावर हिला एक, बागलकोट बीव्हीव्ही मॅनेजमेंट स्टडीजची विद्यार्थिनी सपना कजूर, निपाणी केएलईएसजीआय बागेवाडी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी ज्योती अरुण चव्हाण यांना प्रत्येकी एक अशा एकूण चार पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांना पाच सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले.
बेळगावच्या केएलएस गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सची विद्यार्थिनी अक्षता बाळकृष्ण भट, जमखंडी तुंगळ स्कुल ऑफ बेसिक अँड आप्लेन्ड सायन्स विद्यार्थिनी सावित्री हिरेमठ, अशी पदवी विभागातील विद्यार्थ्यांना दोन सुवर्णपदके, एससीपी आणि डीडीएस कॉमर्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री शिवलिंगाप्पा बागेवाडी, गोकाक येथील सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयाची विद्यार्थिनी सविता परकनट्टी, सौंदत्ती सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुरेश मालकाप्पा बिदरी, अशा पदवी विभागातील कला शाखेच्या विद्यार्थिनींना प्रत्येकी एक सुवर्णपदक अशी एकूण दहा सुवर्णपदे प्रदान करण्यात आली. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील उच्च पदवी प्राप्त केलेल्या एकूण ८६ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
या दीक्षांत समारंभाला उपस्थित असलेले नवी दिल्लीचे सेंटर फॉर द स्टडी ऑफ जेनेटिक अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक प्रो. व्ही. एस. चौहान यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले, भारताला सुरुवातीपासून अनेक समस्या आणि आव्हाने होती. त्यावेळी देशात फार कमी शैक्षणिक संस्था होत्या. मात्र आता तो काळ बदलला असून, हजाराहून अधिक शैक्षणिक संस्था पुढे आल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण देऊन या देशातील तरुणांना चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास कुलगुरू प्रो. बसवराज पधमशाली, मूल्यमापन कुलगुरू प्रो. विरानगौडा बी पाटील, वित्त अधिकारी प्रो. डी. एन. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments