Belagavi

भालचंद्र जारकीहोळी यांचा दलित संघटनांतर्फे सत्कार

Share

 राष्ट्रीय दूध महासंघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल केएमएफचे अध्यक्ष अरभावीचे . भालचंद्र जारकीहोळी यांचा विविध दलित संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

होय, राष्ट्रीय दूध महासंघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल केएमएफचे अध्यक्ष व अरभावीचे आ. भालचंद्र जारकीहोळी यांचा विविध दलित संघटनांच्या वतीने आज बेळगावातील संकम हॉटेलमध्ये सत्कार करण्यात आला. दलित संघटनांच्या वतीने दलित नेते महालिंग कोलकार यांनी आ. भालचंद्र जारकीहोळी

यांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधून, बुद्ध व आंबेडकर यांचा पुतळा देऊन विशेष सत्कार केला.

यावेळी बोलताना महालिंग कोलकार यांनी आ. भालचंद्र जारकीहोळी यांच्या नेतृत्वगुणांमुळे राष्ट्रीय दूध महासंघाच्या संचालकपदी निवड झाली असून त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत असे सांगून त्यांची निवड केल्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले. सरकारने जारकीहोळी बंधूंपैकी एकाला मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकपद देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.

यावेळी अरविंद गट्टी, शिवानंद संजीवगोळ, सविता कांबळे, साईनाथ कोलकार, कविता कोलकार, शिवाजी कांबळे, मोहम्मद मुजावर यांच्यासह दलित नेते उपस्थित होते.

 

 

 

Tags: