बेळगाव वकील संघटनेतर्फे मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

बेळगाव वकील संघटनेच्या सभागृहात मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रशेखर जोशी यांनी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन केले. त्यानंतर सर्वाना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन बोलताना न्या. जोशी म्हणाले, गेल्या २ वर्षांचा इतिहास पाहता सांसर्गिक रोगांचा मुकाबला करून पुढे येण्याची हिंमत सर्वानी दाखविलेली दिसून येते. अनेकांना कोविडची बाधा झाली. अनेकांना जीव गमवावा लागला. तर अनेकजणांनी त्यावर यशस्वीपणे मातही केली. विशिष्ट जात-धर्म म्हणून नव्हे तर सगळ्यांनी एकत्रितपणे या साथीचा मुकाबला केला आहे. आम्ही काही करायचे ठरविले तर प्रयत्नपूर्वक ते करू शकतो हे त्यातूनच दिसून आले आहे असे न्या. जोशी म्हणाले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सहाव्या सत्र न्यायालयाच्या न्या. संध्या राव, डीसीपी स्नेहा पी. व्ही., वकील संघाचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, उपाध्यक्ष सचिन शिवण्णावर, ऍड. सुधीर चव्हाण, सरचिटणीस गिरीराज पाटील, संयुक्त सचिव बंटी कपाही, पदाधिकारी महांतेश पाटील, अभिषेक उदोशी, आदर्श पाटील, इरफान बयाल, प्रभाकर पवार, पूजा पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments