Belagavi

कसबेकर-मेटगुड क्लिनिकमध्ये आंतरराष्ट्रीय महिलादिन

Share

 ‘अबला नव्हे सबलाया घोषवाक्यांतर्गत बेळगावातील कसबेकरमेटगुड क्लिनिकमध्ये आंतरराष्ट्रीय महिलादिन उत्साहात साजरा करण्यात आला.

मंगळवारी बेळगावातील कसबेकर-मेटगुड क्लिनिकमध्ये आंतरराष्ट्रीय महिलादिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. शशिकला शिरोळ उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांनी, आज महिला विविध क्षेत्रांत आघाडीवर आहेत. लिंगभेद टाळून महिलांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी, महिलांना अबला नव्हे तर सबला केले पाहिजे असे सांगितले.

यावेळी डॉ. बी. एच. मेटगुड, सरोजा मेटगुड, डॉ. पुष्पा बिरादार, डॉ. केतकी भोसले, डॉ. पी. एन. शेषगिरी, डॉ. हेमंत कौजलगी, आनंद बिकली, रूपा तळवार यांच्यासह इस्पितळाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

Tags: