Belagavi

बेळगावात भारत-जपान संयुक्त युद्धसरावाला प्रारंभ

Share

 बेळगावातील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये मंगळवारी भारतजपान संयुक्त युद्धसरावाला प्रारंभ झाला आहे.

होय, 27 फेब्रुवारीपासून बेळगावातील एमएलआयआरसीमध्ये भारत-जपान संयुक्त युद्धसरावाला प्रारंभ करण्यात आला आहे. उभय देशांच्या सैन्यादरम्यान 12 दिवस हा संयुक्त युद्धसराव चालणार आहे. आज, मंगळवारी युद्धसरावाचे संक्षिप्त प्रदर्शन पार पडले. 

भारत आणि जपान दरम्यान 2018 पासूनच संयुक्त युद्धसराव करण्यात येत आहे. यंदाच्या युद्धसरावाला ‘धर्म गार्डियन-2022’ असे नाव देण्यात आले आहे. भारतीय सेनेतर्फे मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या 15 व्या बटालियनचे तर जपान सैन्याच्या ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्सच्या 30व्या तुकडीच्या अनुभवी लढवय्या सैनिकांनी या युद्धसरावात भाग घेतला आहे. जागतिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अनुकूल व्हावे या दृष्टीने हा सर्व करण्यात येत आहे. जंगल, उपनगरी आणि नागरी प्रदेशात दहशतवाद्यांशी मुकाबला करण्याचे प्रशिक्षण या युद्धसरावात देण्यात येत आहे. दहशतवाद्यांविरोधात मोहीम आखणे, घरांवरून दहशतवाद्यांवर गोळीबार करणे, त्यांच्या लपण्याच्या अड्ड्यांवर हल्ला करणे, ते अड्डे उध्वस्त करणे आदींचे प्रशिक्षण या सरावादरम्यान सैनिकांना देण्यात येत आहे.

 

Tags: