Belagavi

जिल्हास्तरीय खुल्या कराटे स्पर्धेत कराटेपटूंचे यश

Share

शोटोकॉन कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाच्या कर्नाटक शाखेतर्फे बेळगावात आयोजित ओपन कराटे चॅम्पिअनशिप-२०२२ स्पर्धेत शोटोकॉन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या विजयनगर-हिंडलगा शाखेच्या कराटेपटूंनी विविध प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करून पदके मिळवली.

बेळगावातील खानापूर रोड, मजगावमधील ब्रह्मनगर येथील लक्ष्मी हॉलमध्ये शोटोकॉन कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाच्या कर्नाटक शाखेतर्फे जिल्हास्तरीय खुल्या कराटे स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत बेळगावसह सांगली, कोल्हापूर, चंदगड, खानापूर आदी ठिकाणच्या कराटेपटूंनी भाग घेतला होता. त्यात शोटोकॉन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या विजयनगर-हिंडलगा शाखेच्या कराटेपटूंनी विविध प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करून पदके मिळवली. त्यांना पाहुण्यांच्याहस्ते सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

६ वर्षांखालील गटात धन्वी मोरजकर, ८ वर्षांखालील गटात सक्षम पाटील, पवित साळुंके, ९ वर्षांखालील गटात वैभवी मोरजकर, १० वर्षांखालील गटात श्रेयश कडोलकर, स्फूर्ती नांदवडेकर, भक्ती भोवी, ११ वर्षांखालील गटात नेहाल पाटील, ओमकार शिंदे, १२ वर्षांखालील गटात श्रेयस कुंडेकर, प्रेमजीत भावलदे, शुभम साळुंके, निक्सी लिमा, यश मेणसे, योगेश चलवेटकर यांनी कटा, कुमिटे आदी प्रकारात सुवर्ण व अन्य पदके मिळवली. हे कराटेपटू कराटे प्रशिक्षक भरमानी मल्लाप्पा पाटील, चलवेनहट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: