Belagavi

आरएल लॉ कॉलेजतर्फे अभिरूप न्यायालय स्पर्धा

Share

 बेळगावातील केएलएस संस्थेच्या राजा लखमगौडा कायदा महाविद्यालयातर्फे 11 ते 13 मार्च या कालावधीत बारावी राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धा आयोजित केल्याची माहिती संचालन समितीचे सदस्य ऍड. आर. एस. मुतालिकदेसाई यांनी दिली.

बेळगावात मंगळवारी प्राचार्य डॉ. ए. एस. हवालदार यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना  ऍड. मुतालिक म्हणाले, 11 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वा. महाविद्यालयाच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाचे न्या. एस. सुनीलदत्त यादव यांच्याहस्ते राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे उदघाटन होईल. कर्नाटक कायदा संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील अनंत मंडगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. केएलएस संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील पी. एस. साहुकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचा समारोप 13 मार्च रोजी सायंकाळी 4.30 वा होणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या न्या. के. एस. हेमलेखा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. केएलएस संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील पी. एस. साहुकार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या अभिरूप न्यायालय स्पर्धेत भारतभरातील 10 राज्यातील 25 संघ भाग घेणार आहेत. वकील आणि शिक्षणतज्ज्ञ मिळून सुमारे 30 जण परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत असे ऍड. मुतालिक-देसाई यांनी सांगितले.

या स्पर्धेत एकूण 80,000 रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्या संघाला 30,000 रुपये, उपविजेत्या संघाला 20,000 रुपये तर उत्कृष्ट म्युटरसाठी 6,000 रुपयांचे बक्षीस बेळगावातील प्रसिद्ध वकील अशोक पोतदार यांच्या नावे देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला अभिरूप न्यायालय स्पर्धेच्या संयोजिका सहाय्यक प्रा. अश्विनी परब उपस्थित होत्या.

 

 

Tags: