महिलांना रोजच्या कामाच्या रहाटगाडग्यातून थोडी फुरसत, थोडा निवांतपणा मिळावा या हेतूने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बेळगावात आज महापालिकेतर्फे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

बेळगावातील कट्टीमनी सभागृहात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. केशभूषा, वेशभूषा, संगीतखुर्ची आदी स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. महिलांनी त्यात भाग घेऊन आनंद लुटला.
यावेळी बोलताना सामान्य प्रशासन विभागाच्या तारामती शेळ्ळीकेरी म्हणाल्या, महानगर पालिकेतर्फे दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येतात. महिलांना रोजच्या कामातून चार क्षण निवांत मिळावेत यासाठी 40 आणि 60 वर्षांखालील महिलांचे दोन स्वतंत्र गट करून त्यांच्यासाठी केशभूषा, वेशभूषा, संगीतखुर्ची, नृत्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या आहेत असे सांगितले. 
यानंतर बसवराज हिरेमठ म्हणाले, आंतरराष्ट्रीय महिलादिन साजरी करण्याची प्रथा १९०८ पासून सुरु झाली. त्यावेळी अमेरिकेत २८ फेब्रुवारी १९०८ रोजी पहिला महिलादिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्देशानुसार १९७५ पासून ८ मार्च रोजी अंतर्राष्त्री महिलादिन साजरा करण्यात येतो.
यावेळी भाग्यश्री हुग्गी म्हणाल्या, भारतीय महिला परिपूर्णतेचे प्रतीक आहेत. देवाधर्माच्या काळापासून, स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतरही समाजाच्या जडणघडणीत भारतीय महिलांनी मोठे योगदान दिले आहे.
यावेळी पालिका उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर, पालिका आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ आदी उपस्थित होते.


Recent Comments