Hukkeri

निधी उपलब्ध करून देण्यासाठी महांतेश दोड्डगौडर यांनी उपस्थित केला मुद्दा

Share

बेळगाव जिल्ह्यातील विविध मतदारसंघांना कोट्यावधी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. परंतु 2018 पासून अनुदान मागण्यात येत असून विविध सहा कामकाजासाठी अनुदान मंजूर करण्यात येत नसल्याबद्दल कित्तुरचे आमदार महांतेश दोड्डगौडर यांनी सरकार समोर सवाल उपस्थित केला.

मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनात प्रश्नोत्तर कालावधीत सहभागी झालेले कित्तुरचे आमदार महांतेश दोड्डगौडर यांनी सभागृहात आपला मुद्दा उपस्थित केला. 2018 सालापासून अनेक कामकाजासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु अद्याप आपल्याला या कामकाजासाठी निधी मंजूर झाला नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. याच जिल्ह्यातील विविध मतदारसंघांना अनेक टप्प्यांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचा मला आनंद आहे. परंतु माझ्या मतदारसंघाला अनेकदा विचारणा करण्यात येऊनही अनुदान देण्यात आले नाही, यामुळे आपल्या मतदार संघातील विविध कामकाजासाठी मागितलेला निधी मंजूर करण्यात यावा असा आग्रह यावेळी महांतेश दोड्डगौडर यांनी केला.

या मुद्द्यावर प्रत्युत्तर देताना मंत्री गोविंद कारजवळ यांनी निधी उपलब्ध झाल्यावर अनुदान देण्यात येईल असे आश्वासन दिले.

बेळगाव जिल्ह्यातील विविध मतदारसंघांसाठी 10 कोटी, 21 कोटी, 9 कोटी, 5 कोटी अशा पद्धतीने अनुदान देण्यात आले आहे. परंतु आपल्याही मतदारसंघातील विकासकामांसाठी आपल्याला निधी उपलब्ध करून अनुदान जाहीर करण्याचा आग्रह महांतेश दोड्डगौडर यांनी केला.

Tags: