दुसऱ्या कर्नाटक राज्य पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत बेळगावच्या टेबल टेनिसपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करून बेळगावच्या लौकिकात भर घातली आहे.

बेळगावच्या जेबी स्पोर्ट्स फौंडेशनच्या ललिता गवस हिने महिला विभागात चमकदार कामगिरी करून सुवर्ण पदक मिळवले तर आरती पवार हिने रौप्य पदक मिळवले. आणखी एका महिला विभागात मायव्वा सन्नींगन्नावर हिने सुवर्ण पदक मिळवले. सविता अज्जीनकट्टी हिने रौप्य पदक्ष उपविजेतेपद पटकावले. पुरुष विभागात दिनेश सिद्रागवळी याने रौप्य, अप्पय्या कणवी आणि गिरीश सव्वाशेरी यांनी कांस्य पदक मिळवले. पुरुषांच्या आणखी एका विभागात फकीरप्पा याने कांस्य पदक मिळवले. या टेबल टेनिसपटूंना प्रशिक्षक संतोष जोशी, दिनेश भिरडे यांचे मार्गदर्शन लाभले.


Recent Comments