आपल्याच मित्राच्या पाठीत खंजीर खुपसून मित्राचा खून करून त्याचा मृतदेह गवत गंजीत घालून जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मित्राच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाचा जाब विचारणाऱ्या मित्रावरच त्याच्या दुसऱ्या मित्राने वार केला आहे.
संतोष परीट (वय ३६) असे मृत युवकाचे नाव आहे. महाराष्ट्रातील चंदगड नगर येथील रहिवासी आणि कणबर्गी येथील रहिवासी परशुराम कुरबर हे दोघेही चांगले मित्र होते. दरम्यान संतोष याच्या पत्नीशी परशुराम कुरबर याच्या असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. यादरम्यान संतोषच्या पत्नीला आपल्याच घरात ठेवल्याची माहितीही मिळाली आहे.
बेळगाव येथील मालिनी नगर परिसराच्या बाहेरील भागात असणाऱ्या एका शेतवाडीत गवत गंजीत घालून सदर मृतदेह जाळण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलीस स्थानकांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला होता. प्राथमिक अंदाजात हि व्यक्ती चंदगड या भागातील असल्याचे उघडकीस आले. यानंतर पोलीस तपासात संतोषची पत्नी आणि परशुराम यांचे अनैतिक संबंध असल्याचे उघडकीस आले. १ मार्च रोजी बेळगावमधील कणबर्गी येथे आलेल्या संतोषने परशुरामला जाब विचारला. आणि जाब विचारल्याच्या रागातून तसेच आपले बिंग फुटेल या भीतीने परशुरामाने संतोषचा गळा आवळून खून केला. सदर मृतदेह गवत गंजीत घालून जाळण्यात आला होता. हि सारी माहिती पोलीस चौकशीत उपलब्ध झाली आहे.
मृत संतोषची पत्नी आणि संतोषचा स्नेही परशुराम यांच्यात असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. बेळगाव पोलिसांनी या प्रकरणाचा छडा अत्यंत जलदगतीने लावला असून सध्या आरोपी परशुराम याला अटक करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.


Recent Comments