देवस्थानांमध्ये श्रद्धेसाठी देवाला नारळ, फळ, फुलं, गोडाचा नैवेद्य, तांदूळ, दुर्वा, पैसे अशा अनेक गोष्टी दान करण्यात येतात. यातून जर का नवसाला पावणारा देव असेल तर मग विचारूच नका…परंतु विजापूरमधील एका देवस्थानात चक्क दारूचा नैवेद्य चढविण्याची प्रथा आहे. या विशेष प्रथेबद्दल जाणून घेऊयात या पुढील रिपोर्टमधून….

हातात दारूची बाटली घेऊन हि कोणत्याही दारूच्या दुकानासमोरील गर्दी नसून विजापूरमधील बबलादी मूत्यान सदाशिव यात्रोत्सवातील आहे . वर्षानुवर्षे चालत आलेल्या या प्रथेत भाविक येथील देवासाठी महागडी दारू घेऊन येतात. स्कॉच, व्हिस्की सारख्या दारूच्या बाटल्या येथील देवस्थानात नैवेद्य म्हणून अर्पण करण्यात येतात. शिवरात्रीच्या नंतर पाचव्या दिवशी याठिकाणी जत्रा भरते. नारळ आणि फुलांसह महागडी दारू, रम, स्कॉच देखील येथे भाविक घेऊन येतात. येथे असलेली शक्तिदेवता चांद्रवव हिच्या गदगेवर असलेल्या पात्रात हि दारू नैवेद्य म्हणून ओतली जाते. आपल्या श्रदेपोटी या सर्व गोष्टी येथील भाविक वर्षानुवर्षे करत आले आहेत. 
या यात्रोत्सवामागेही एक पार्श्वभूमी आहे. अनेक वर्षांपूर्वी याभागात सदाशिव मूत्या यांनी आपल्या अध्यात्मिक साधनेतून कृष्णा नदीच्या पाण्याचे दारूत रूपांतर केले. हा चमत्कार झाल्यानंतर येथील गावकऱ्यांनी सदाशिव मूत्या यांना पुजायला सुरुवात केले. त्यानंतर सदाशिव मूत्या यांनी याच गावात संजीवन समाधी घेतली, आणि याचठिकाणी मठ देखील बांधण्यात आला. आजपर्यंत याठिकाणी सदाशिव मूत्या यांच्या भक्तीसाठी यात्रोत्सव साजरा केला जात आहे अशी आख्यायिका आहे.आजपर्यंत याठिकाणी कोणतीही आपत्ती आली नाही. प्रत्येक वर्षी भरणाऱ्या यात्रोत्सवात भविष्यवाणी वर्तविण्यात येते आणि हि भविष्यवाणी खरी ठरते अशीही भाविकांची श्रद्धा आहे.
३०० वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या या बबलादी गावातील सदाशिव मूत्या यात्रोत्सवात अनेक विविध चालीरीती पाळल्या जातात. याचप्रमाणे येथील देवीला दारूचा नैवेद्य अर्पण करण्याचीही प्रथा असून चिंकोयाप्पा या कालज्ञानींनी लिहिलेल्या पाठातील १ पण प्रत्येक वर्षीच्या यात्रोत्सवात भविष्यवाणी म्हणून वाचून दाखविण्यात येते. तसेच हिभविष्यवाणी खरी ठरत असल्याचीही भाविकांची समजूत आहे.
आपली मराठीसाठी, विजयकुमार सारवाड, विजापूर


Recent Comments