Belagavi

बेळगावातील मराठा समाज कार्यकर्ते होदेगिरीला रवाना

Share

 राजे शहाजी राजे यांचे होदेगिरी येथील समाधीला भेट देण्यासाठी समाधीच्या सुधारणा कार्यक्रमासंदर्भात पुढील रूपरेषा आखण्यासाठी  मराठा समाजाचे कार्यकर्ते रवाना झाले.

बेळगावातील छत्रपती शिवाजी उद्यानात सोमवारी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून हे कार्यकर्ते होदेगिरीला रवाना झाले.

मराठा समाजाचे स्वामी  मंजुनाथ स्वामी यांचा सत्कार 15 मे रोजी बेळगाव येथे होणार आहे. त्यासाठी त्यांना आमंत्रण देण्यासाठी कार्यकर्ते बेंगलोरयेथे स्वामींची भेट घेणार आहेत. मराठा समाजाचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करून समाजाला एकत्र करण्याचा मानस कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. यावेळी दत्ता जाधव, किरण जाधव, संजय कडोलकर, सुनील जाधव, सागर पाटील, चंद्रकांत कोंडुस्कर, रमेश रायजादे, गुणवंत पाटील, महादेव पाटील, रमेश गोरल, प्रदीप चव्हाण, विशाल कंग्राळकर, केदारी करडी, मोहन पाटील, राजन जाधव, यासह अन्य मराठा  बांधव उपस्थित होते.

 

Tags: