महाराष्ट्रातील चंदगड येथील संपकरी परिवहन कर्मचाऱ्यांना बेळगावातील ऑपरेशन मदत या संघटनेतर्फे जीवनावश्यक साहित्याची मदत देण्यात आली.

होय, गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात परिवहन कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरु आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील कर्मचाऱ्यांनीही भाग घेतला आहे. गेल्या ४ महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्यामुळे त्यांना कुटुंब चालविणे कठीण झाले आहे. मुलांचा शाळेचा खर्च, आणि दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे. चंदगड आगारातील अनेक कर्मचारी मध्य महाराष्ट्र, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड, परळी आणि विदर्भातील आहेत. नोकरीमुळे घरादारापासून दूर वास्तव्य करून असलेल्या या कर्मचाऱ्यांना कसलीही मदत मिळणे कठीण झाले आहे. पुरुष कर्मचाऱ्यांना खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करावे लागत आहे तर महिलांना मजुरी करावी लागत आहे. त्यांच्या मुलांची अवस्था तर खूपच कठीण झाली आहे. हे पाहून बेळगावातील फेसबुक फ्रेंड्स सर्कलने ऑपरेशन मदत अंतर्गत तांदूळ, गहू, तेल, साबण, टूथपेस्ट, मच्छर अगरबत्ती आदी साहित्याची त्यांना मदत केली. चंदगडचे संजय साबळे, तानाजी चंडेकर, पुष्पा सुतार, दीपक पाटील आदी परिवहन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना ही मदत देण्यात आली. बाईट
यावेळी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे सदस्य, परिवहन कर्मचारी, चंदगडमधील मान्यवर आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.


Recent Comments