शोटोकॉन कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाच्या कर्नाटक शाखेतर्फे बेळगावात आयोजित ओपन कराटे चॅम्पिअनशिप-२०२२ स्पर्धेत शोटोकॉन कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या विजयनगर-हिंडलगा शाखेचा कराटेपटू श्रेयस कुंडेकर याने सुवर्णपदक मिळवले आहे.

बेळगावातील खानापूर रोड, मजगावमधील ब्रह्मनगर येथील लक्ष्मी हॉलमध्ये शोटोकॉन कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाच्या कर्नाटक शाखेतर्फे जिल्हास्तरीय खुल्या कराटे स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत बेळगावसह सांगली, कोल्हापूर, चंदगड, खानापूर आदी ठिकाणच्या कराटेपटूंनी भाग घेतला होता.
त्यात श्रेयस चंद्रकांत कुंडेकर याने कराटे फाईट प्रकारात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक तसेच काटा प्रकारात द्वितीय क्रमांक व पदक मिळवले. त्याला पाहुण्यांच्याहस्ते सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. श्रेयस कुंडेकर हा वनिता विद्यालय इंग्रजी माध्यम शाळेत आठवीच्या वर्गात शिकत आहे. त्याला कराटे प्रशिक्षक भरमानी मल्लाप्पा पाटील, चलवेनहट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. याआधी उदयपूर, राजस्थान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तसेच सांगली येथे झालेल्या निमंत्रितांच्या कराटे स्पर्धेत त्याने सुवर्णपदके मिळवली आहेत.


Recent Comments