Belagavi

बेळगावात बॉंक्साईट रोडवर ‘बर्निंग कार’चा थरार

Share

धावत्या कारमध्ये अचानक आग लागून संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना शुक्रवारी बेळगावातील बॉंक्साईट रोडवर घडली. सुदैवानेच कारमधील लोक बचावले आहेत. ‘बर्निंग कारचा हा थरार पाहून वाटसरूही चक्रावले

होय, बेळगावातील बॉंक्साईट रोडवर शुक्रवारी दुपारी आश्चर्यकारक पण दुर्दैवी घटना घडली. रस्त्यावरून जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला. कारमध्ये धूर व आग दिसताच कारमधील लोकांनी वाहन थांबवून बाहेर धाव घेतली. त्यामुळे सुदैवाने ते बचावले. मात्र बघताबघता संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. कोणीतरी अग्निशामक दलाला याची माहिती दिली. त्यावर अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविली. या प्रकरणाची नोंद एपीएमसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

 

 

Tags: