Belagavi

गणेशपूर रुद्र केसरी मठात वार्षिकोत्सव समारंभ

Share

गणेशपूर येथील तेज प्रतिबिंब पिठाच्या रुद्र केसरी मठ सेवा समितीच्या जगद्गुरू सिद्धारूढ महास्वामी यांचा दहावा वार्षिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

३ आणि ४ मार्च असे दोन दिवस आयोजित केलेल्या या समारंभात विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला.

यासंदर्भात माहिती देताना या मठाचे पुजारी म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही जगद्गुरू सिद्धारूढ स्वामींचा दहावा वार्षिकोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या औचित्याने अखंड चरित्र पारयांसह अनेक धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. महान स्वामींच्या नेतृत्वाखाली धर्मसभेचे आयोजन देखील करण्यात आले होते. आज सायंकाळी याठिकाणी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हुबळी येथे सिद्धारूढ दर्शन घेतल्यानंतर येथे दर्शन घ्यावे लागते, अशी प्रथा असल्याचे ते म्हणाले. यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी भाजप ग्रामीण मंडळ जिल्हाध्यक्ष संजय पाटील आणि धनंजय जाधव यांनी देवस्थानाला भेट दिली. आज सायंकाळी सुरु होणाऱ्या यात्रा महोत्सवात हुबळी येथील षडाक्षरी स्वामी, शिक्कमुनवळ्ळी येथील दिव्यचेतन शिवपुत्र स्वामी, जारकीहोळी येथील कृपानंद स्वामी, होसूर मठाचे प्रभू नीलकंठ स्वामी, जोडकोरुळी येथील चिद्घनानंद स्वामी, बेळगाव आर्ष विदयाश्रमाचे चितप्रकाशानंद सरस्वती स्वामी, सिद्दानकोळ्ळ येथील गंगाधर स्वामी या धर्मसभेत सहभागी होणार आहेत. या यात्रा महोत्सवाचा आणि महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घयावा असे आवाहन रुद्रकेसरी मठ व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आले आहे.

Tags: