उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून एका दुकानात घुसल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावात घडली. त्यामुळे दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

अंकली गावातील सौंदत्ती रस्त्यावरील शोएब मुल्ला यांच्या फॅब्रिकेशन दुकानात उसाने भरलेला ट्रॅक्टर घुसल्याची घटना घडली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. दुकानातील साहित्याचे यात मोठे नुकसान झाले. सुदैवानेच या घटनेत प्राणहानी झाली नाही. घटनास्थळी अंकली पोलिसांनी भेट देऊन ट्रॅक्टर हटविण्याची व्यवस्था केली.


Recent Comments