चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कारने टमटम वाहनाला धडक दिल्याने 10 पौरकार्मिक जखमी झाले हा अपघात शुक्रवारी सकाळी बेळगाव तालुक्यातील कलखांब गावाजवळ झाला.

कलखांब गावचे 10 सफाई कर्मचारी कामावर हजर होण्यासाठी टमटम वडाप रिक्षातून बेळगावकडे जात असताना दुसऱ्या बसस्टॉपजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात सर्व 10 सफाई कर्मचारी जखमी झाले आहेत. अर्जुन मेत्री, कल्पना मेत्री, सुंदर कोलकार, शकुंतला मेत्री, गंगू मेत्री, इंदू मेत्री, गीता कोलकार, सुवर्ण मेत्री, पिराजी मेत्री, गुलाबी मेत्री अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारांसाठी बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.



Recent Comments