Chikkodi

चिकोडी येथील मुगळी गावात मोटर सायकल डर्ट रेस

Share

शिवरात्री आणि बसवेश्वर यात्रेनिमित्त चिकोडी तालुक्यातील मुगळी या गावात गजानन रेसिंग संघटनेच्यावतीने गावाबाहेर मैदानात मोटर सायकल डर्ट रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

चित्तथराक वेग आणि एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी लागलेली हि मोटर सायकलस्वारांची स्पर्धा… हे चित्र आहे चिकोडी तालुक्यातील मुगळी या गावातील गेल्या ९ वर्षांपासून शिवरात्री आणि बसवेश्वर यात्रेनिमित्त चिकोडी तालुक्यातील मुगळी या गावात गजानन रेसिंग संघटनेच्यावतीने प्रत्येक वर्षी हि स्पर्धा आयोजित करण्यात येते. गेल्या २ वर्षात निर्माण झालेल्या कोविडजन्य परिस्थितीमुळे हि स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. मात्र यंदा पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत ओपन क्लास, ४ स्ट्रोक क्लास, ९ स्ट्रोक क्लास यासह वेस्टर्न क्लास बाईक रेस आयोजित करण्यात आली होती. या बाईक रेसमध्ये गोवा, महाराष्ट्रातील इचलकरंजी, पुणे, कोल्हापूर यासह हुबळी मधील स्पर्धकांनीही सहभाग घेतला होता. सुझुकी, युवा असा अनेक दुचाकी वाहनांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत उपस्थितांच्या अंगावर शहरे आणले.

कोविड मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हि स्पर्धा गेली २ वर्षे आयोजित करण्यात आली नव्हती. दोन वर्षानंतर पुन्हा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी चिक्कमंगळूर, शिवमोगा, बेंगळुरू, म्हैसूर, तुमकूर याठिकाणी प्रत्येक महिन्यात एकदा ते दोनदा या स्पर्धा भरविल्या जातात. परंतु आता वर्षातून एकदाच या स्पर्धा भरविल्या जात असून उत्तर कर्नाटक भागात देखील बाईक रेस स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली ,

उत्तर कर्नाटकात अशा पद्धतीच्या स्पर्धा खूप कमी ठिकाणी भरविल्या जातात. सध्या मुगळी या गावात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग घेऊन मोठ्या उत्साहात हि स्पर्धा पार पाडली आहे.

Tags: