बेळगाव देवराज अरस कॉलनीमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आले. येत्या १५ दिवसात समस्या सोडविण्यात न आल्यास बेळगाव रायचूर राष्ट्रीय महामार्गावर भव्य आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिकांनी दिलाय.

बेळगाव देवराज अरस कॉलनी येथील प्रभाग क्रमांक ४८ मधील बसवणकुडची गावात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. या भागात पायाभूत सुविधा नसल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांचे निराकरण करण्यात यावे, या आग्रहास्तव येथील स्थानिकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
यासंदर्भात वकील वाय के दिवटे यांनी देवराज अरस कॉलनीमधील बुडा वॉर्ड क्रमांक ४८ मध्ये ड्रेनेज सुविधा नसल्याने उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल माहिती दिली. ड्रेनेज सुविधा नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत असून यामुळे येथील जनतेला समस्या निर्माण होत आलस्याचे ते म्हणाले. यासाठी स्थानिक नगरसेवकांना निवेदन देण्यात आले आहे. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे आग्रह करत असून येथील समस्या येत्या १५ दिवसांच्या आत सोडविण्यात न आल्यास राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
बसवणकुडची आलारवाड गावातील रहिवाशांनी येथील पायाभूत सुविधांच्या अभावाबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती दिली. रस्ते, गटारी, ड्रेनेज समस्या, गतिरोधक, यासह बायपास मार्ग निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले. सुमारे १९७२ साली याठिकाणी लेआऊट करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत आलारवाड बसवणकुडची गाव पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. या समस्या तातडीने सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.)
येत्या १५ दिवसात या भागातील पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी पाउल उचलण्यात न आल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


Recent Comments