महाशिवरात्रीनिमित्त केलेल्या जागरणावेळी ४ वर्षाच्या बालिकेने गायिलेल्या भक्तीगीतांचा व्हीडिओ विजापुरात सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

होय, विजापुरात षडाक्षरी कंपू यांची ४ वर्षांची मुलगी श्रुती हिने काल महाशिवरात्रीनिमित्त पालकांसोबत जागरण करून पहाटे ३ वाजता शंकराची भक्तिगीते गायिली. आपल्या बोबड्या आवाजात, “शिवासारखे दुसरे नाही कोणी”, “दयामाया करुणामया” आदी भक्तिगीते तिने गाऊन सर्वाना आश्चर्यचकित केले. तिच्या भक्तिगीतांचा हा व्हीडिओ विजापुरात सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याला शिवभक्तांनीही मोठ्या प्रमाणात लाईक केले आहे. नेटकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.


Recent Comments