Belagavi

बेळगाव मधील एकूण १७ विद्यार्थी युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न

Share

बेळगाव जिल्ह्यातील एकूण 19 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. यापैकी बैलहोंगल तालुक्यातील दोन विद्यार्थी सुखरूप परतले आहेत. उर्वरित 17 विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अशी माहिती जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी दिली.

: बुधवारी बेळगाव मधील आपल्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी यांनी सदर माहिती दिली आहे . कर्नाटक सरकारने नोडल अधिकारी मनोज यांची काल भेट घेऊन जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे. सध्या एकूण १७ विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले असून त्यांची संपूर्ण माहिती तहसीलदारांना पाठविण्यात आली आहे. तहसिलदारांना सदर विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर देण्याची सूचना देण्यात आली आहे . यानुसार आतापर्यंत १२ विद्यार्थ्यांचा कुटुंबीयांची तहसीलदारांनी भेट घेतली आहे अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

मंगळवारी घटप्रभा येथील चौगुला यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला आहे. सदर विद्यार्थ्यांच्या पालकांशी सातत्याने आपण संपर्कात असून या पालकांची भेट घेऊन त्यांना धीर देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आली आहे युक्रेनमधील पूर्व भागात अधिकाधिक विद्यार्थी अडकून असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले

के डी पी बैठकीमध्ये हरभरा केंद्र स्थापन करण्यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे. त्यानंतर हरभरा केंद्र उघडण्यात येत असून सौंदत्ती आणि रामदुर्ग येथे केंद्र सुरू करण्यात आले आहे. नावनोंदणीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. तसेच रामदुर्ग तालुक्यातील बालकांचा मृत्यू संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईदेखील करण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

एकंदर आज झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी सातत्याने प्रयत्न करत येत असल्याची माहिती देत विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Tags: