Belagavi

कडोली श्री दुरदुन्डेश्वर मठात यात्रेचे आयोजन यात्रेनिमित्त जनावरांचा प्रदर्शन समारंभ

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली या गावातील श्री दुरदुन्डेश्वर मठात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगाव तालुक्यातील कडोली या गावातील दुरदुन्डेश्वर मठात सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी कडोली येथे जनावरांचे तसेच पशुधन प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कारंजीमठाचे श्रीगुरु सिद्ध महास्वामी आणि दुरदुन्डेश्वर मठाचे श्री गुरू बसवलिंग स्वामीजी यांच्या हस्ते पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली (फ्लो)

या यात्रा महोत्सवाला १०० वर्षांचा इतिहास असून प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी भव्य प्रमाणात यात्रा भरवण्यात येते. यंदा जनावर प्रदर्शन तसेच कुस्ती स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती श्री गुरू बसवलिंग महास्वामी यांनी दिली.

मुख्य पशुवैद्य अधिकारी डॉक्टर श्रीकांत गावी यांनी माहिती देताना सांगितले की, विविध जातीच्या म्हशी, गाई, बैल या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. २३० हुन अधिक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात उत्साहाने सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना जनावरांसाठी दुग्ध उत्पादन आणि कीटकनाशकांचा वापरासंदर्भात माहिती देण्यात आली.

कडोली येथील श्री दुरदुन्डेश्वर मठाच्या यात्रा महोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Tags: